भऊर ता.देवळा जि.नाशिक
gpbhaur1951@gmail.com
सुचना :
काही गावांचे नशीब थोर असते. राम-लक्ष्मण-सीता यांच्या वास्तव्यामुळे नाशिक, संत तुकाराम महाराजांमुळे देहू, संत ज्ञानेश्वर महाराजांमुळे आळंदी, तसेच विठ्ठल-रखुमाईमुळे पंढरपूर आणि गिरणा नदीमुळे भाऊर गावाला चिरंजीव पद प्राप्त झाले आहे.
गिरणा नदी भाऊर गावाच्या उत्तरेकडून पश्चिमेकडे वाहते. येथील शेतकरी मेहनती आणि जिद्दी आहेत. ते नदीकाठी विहिरी खोदून, त्यावर विजेचे पंप बसवून पाइपलाइनद्वारे शेतात पाणी नेतात आणि उत्तम शेती करतात. गावाचे एकूण क्षेत्रफळ १३५५.१८ हेक्टर असून, यात बागायती क्षेत्र ११४७.०० हेक्टर आहे.
भाऊर ग्रामपंचायत कार्यालयाची स्थापना १ मे १९५१ रोजी झाली. यात १२ सदस्य नेमले जातात. गावात शिक्षणाला चालना मिळावी यासाठी, पहिली मराठी शाळा १ सप्टेंबर १८९८ रोजी स्थापन झाली. त्यानंतर काही दिवसांनी इयत्ता १ ते ४ थी पर्यंतच्या एकूण ६ जिल्हा परिषद शाळा गावात सुरू झाल्या. इयत्ता ५ वी ते १० वी आणि त्यापुढील शिक्षणासाठी गावात 'श्री सिद्धेश्वर विद्यालय भाऊर' ची स्थापना ११ जून १९७७ रोजी ज्ञानदेव दादा देवरे ग्रामशिक्षण समिती, उमराणे यांनी केली.
गावातील लोकांना आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत यासाठी, बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा २९ डिसेंबर १९८२ रोजी स्थापन झाली. गावात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तीन चांगले डॉक्टर देखील आहेत. पत्रव्यवहार सुरळीत चालावा यासाठी पोस्ट खातेही गावात आहे.
गावात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात पीर बाबांची मोठी यात्रा भरते. भाऊर गावाला 'निर्मल गाव' म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक मिळाले आहे. गावातील लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचे वैमनस्य नाही, त्यामुळे या गावाला 'महात्मा गांधी तंटामुक्त गाव' म्हणून जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले आहे. संत गाडगे बाबा स्वच्छता मोहिमेतही या गावाचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. गावातील सर्व लोक सुखाने आणि समृद्धीने नांदत आहेत.
🌾 ग्रामपंचायत क्षेत्रफळ (हेक्टर मध्ये)
🏢 वार्ड संख्या
👥 पुरुष संख्या
👥 स्त्री संख्या
👥 कुटुंब संख्या
👥 एकूण लोकसंख्या
महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात भऊर हे गाव आहे.हे गाव उत्तर महाराष्ट्र प्रदेशातील आहे. हे गाव जिल्हा मुख्यालय नाशिकपासून ६८ किमी अंतरावर आहे.देवळा पासून १० किमी. राज्याची राजधानी मुंबईपासून २५४ किमी.आहे.भऊर चे पोस्ट मुख्य कार्यालय देवळा येथे आहे.
जवळपास , विठेवाडी , खामखेडा, वरवंडी , मटाने ,बगडू ,कळवण ,सटाणा ,चांदवड ,मालेगाव , हि शहरे आहेत.
गावातील लोकांमध्ये एकमेकांविरोधात कोणत्याही प्रकारचे वैर नाही. त्यामुळेच गावाला 'महात्मा गांधी तंटामुक्त गाव' म्हणून गौरवण्यात आले आहे. या गावाला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिकही मिळाले आहे.
भाऊर गावाला 'निर्मल ग्राम' म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक मिळाले आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातही गावाचे नाव प्रथम क्रमांकावर आहे.
हागणदारीमुक्त गाव, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रम व अभियानात गावाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
श्री. ओमकार पवार (IAS)
श्रीमती. वर्षा फडोळ-बेडसे
श्री.प्रशांत पवार
श्री.सी.एम.थोरात
श्री.देवीप्रसाद मांडवडे
सौ. चित्रा दादाजी मोरे
सौ. ज्योती दिपक पवार
श्री. शशिकांत दादाजी देवरे
श्री. काशिनाथ नागू पवार
श्री. रविंद्र जिभाऊ पवार
श्री. दादाजी दावल मोरे
श्री. गंगाराम सुभाष ठाकरे
श्री. खंडू शिवाजी माळी
सौ. सुनिता संजय पवार
सौ. सिमा राजेंद्र गरुड
सौ. मीना वैभव पवार
सौ. विजया बाजिराव माळी
सौ. माधुरी पोपट माळी
सुभाष दादाजी पवार
(तंटा मुक्त समिती अध्यक्ष)
भरत जिभाऊ पवार
(पोलीस पाटील)
बाबुराव भिका पवार
(तंटामुक्त समिती उपाध्यक्ष)
पूनम रमेश अहिरे (ग्राम महसूल अधिकारी)
जिभाऊ पोपट गरुड (महसूल सेवक)
विनोद गायकवाड (सहाय्यक कृषी अधिकारी)
साहेबराव तानाजी माळी (बी.एल.ओ.)
शशिकांत दादाजी देवरे (बी.एल.ओ.)
लखन तानाजी गरुड (बी.एल.ओ.)